भाषा – संस्कृत, मराठी
संकलक – श्रीकृष्ण वैद्य
Free E-Book –> Click here for pdf file
शाळेतून – Jack and Jill, Humpty Dumpty, Hickory Dickory Dock वगैरे निरर्थक कविता शिकण्यापेक्षा संस्कार करणारी, नीती शिकवणारी, common sense चे धडे देणारी संस्कृत सुभाषिते जरूर शिकायला हवीत. आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी स्वत: वाचावीत व मुलांनाही वाचून दाखवावीत अशी सुभाषिते.
निवडक संस्कृत सुभाषितांचा कोश, मराठी अर्थासहित. या पुस्तकातील काही सुभाषिते –
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ।
तस्यां हि काव्यम् मधुरमं तस्मादपि सुभाषितम् ।।
भाषेतील मुख्य अशी मधुर भाषा देवांची भाषा संस्कृत आहे. त्यातील काव्य मधुर आहे आणि त्याहूनही त्यातील सुभाषिते जास्त मधुर आहेत.
द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा आश्मतां गता ।
सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवं गता ।।
सुभाषिताची गोडी इतकी आहे की द्राक्षे म्लानमुखी झाली (कोमेजली), साखरेचे खडे झाले आणि अमृत देवाघरी स्वर्गांत गेलं.