प्राचीन भारतीय उद्योगांचे स्वरूप

भारत हा एक खंडप्राय देश आहे. वैदिक काळापासून या देशाच्या विविध भागात लोकवस्ती वाढत गेली आणि इ.स. १२०० पर्यंत हा देश एक अतीशय ऐश्वर्य संपन्न असा देश झाला. देश ऐश्वर्यसंपन्न होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक प्रकारचे उद्योग आणि सेवा विकसित झाल्या आणि देशाच्या सर्व प्रांतात अनेक उद्योग व्यवसाय प्रस्थापित झाले. प्राचीन भारताच्या उद्योगांचा विचार करताना देशाची भौगोलिक परिस्थिती, राज्य व्यवस्था, लोकवस्त्यांची स्थाने आणि लोकांचे समुदाय यांचा विचार करावा लागेल. त्यामुळे उद्योग, त्यांची गरज आणि त्यांची विविधता लक्षांत घ्यायला सोपे जाईल.

चाणक्याच्या काळापासून यादव काला पर्यंत म्हणजे इ.स.पूर्व ५०० ते इ.स. १२०० अशा साधारण १७०० वर्षांच्या कालावधीतील उद्योगांबद्दलची ही माहिती, चाणक्याचे अर्थशास्त्र, सातवाहन काळातील गाथासप्तशतीतील माहिती, १३ व्या शतकातील चक्रधरस्वामींचे लीळाचरित्र व अनेक प्रकारच्या संहिता, पुराणे आणि भारताच्या इतिहासाबद्दलची अनेक पुस्तके यांतून घेतलेली आहे. या काळात अनेक प्रकारचे राजे निरनिराळ्या भागात होऊन गेले. सर्व भारतावर एकाच राजाची राजवट ही कांही प्रमाणात सम्राट अशोक आणि नंतर समुद्रगुप्त यांनी केलेली आढळते. पण राज्य कुणाचेही असले तरी व्यापार, उत्पादने यांच्या व्यवस्थापनांत आमूलाग्र असे काहीच फरक आढळत नाहीत. किंबहुना असे म्हणता येईल की व्यापार उद्योग हे जास्त विकास पावत गेले आणि देशाच्या कानाकोप-यात पसरले.

व्यवसाय उद्योगांबद्दल देशाच्या वस्त्यांचे प्रामुख्याने खालील चार भाग करता येतील. ज्यानुसार तेथील गरजा आणि उद्योग समजण्यास सोपे जाईल. हे चार भाग खालील प्रमाणे:

 • राजधान्यांची प्रमुख शहरे तसेच सरदार वगैरेंची गावे- गढी
 • सर्वसामान्य मध्यम किंवा लहान आकाराची गावे, खेडी, वाड्या
 • दूर रानावनांतील आणि डोगराच्या कडे कपा-यात रहाणा-या लोकांच्या वस्त्या
 • नद्या, समुद्र किनारे यांच्या काठची गावे, वस्त्या
क्र. उद्योग उत्पादने व्यवसायाच्या जागा व्यावसायिक
स्थापत्य – बांधकाम चैत्य, गुंफा, लेणी, देवळे, देवतांच्या मूर्ती, विटांची घरे, किल्ले, नदीचे घाट, तलाव हौद, विहिरी, बांध, पाण्याचे पाट, दगडी वस्तू, वरवंट, पाटे, उखळ, जाते, डोण,  वगैरे रानावनांत सोडून सर्वत्र, शहरे, गावे स्थपती, बांधकाम करणारे लोक, विटा करणारे, दगड फोडणारे
शेती अन्नधान्य, भाजीपाला, फळे, फुले, तेल, मद्य, कापूस-वस्त्रे, सामान्यपणे गावांत, अन्य वस्त्यांतून. शेतकरी, विणकर, तेली, मद्य निर्माते, अत्तरे, औषधे करणारे
धातू काम लोखंड, तांबे, पितळ वगैरे खनिजे, ओतीव व घडविलेले लोखंड, मूर्ती, घंटा, शेतीची अवजारे, शस्त्रे, तांब्या पितळेच्या वस्तू, मूर्ती, अनेक प्रकारच्या धातूच्या गोष्टी डोंगर द-यात, गावांत आणि शहरात लोहकाम करणारे, डोंगरात रहाणारे लोक तांब्याची कामे करणारे, अन्य कारागीर बुरूड
धातू काम सुवर्ण-रजत दागिने, मूर्ती, अन्य कलाकृती, जाडावाच्या वस्तू शहरे – गांवे सुवर्णकार, डोंगरातील खनिज काढणारे,
लाकूड काम रथ, बैलगाड्या, घरातील, बांधकामातील लाकुड काम, वाद्ये शहरे, गांवे सुतार, रथकार, पांचाळांपैकी एक
पशु पालन दूध, दुग्धजन्य पदार्थ – लोणी, तूप वगैरे, मांस, कातडी वस्तू, हस्तिदंती वस्तू, लष्करी साहित्य, खोगीर, तंबू, ढाल, चिलखते, पाण्यासाठी पखाली, लोकर, कांबळी, बैठका वगैरे शहरांत, गांवात गोपालन करणारे, चर्मकार, धनगर
नद्या, तलाव, समुद्र मासे व अन्य जलचर – अन्न म्हणून, होड्या, नांवा, बोटी, मोती, खडे, स्फटिक, वाळू, मीठ नदीकाठ, समुद्रकिनारा व्यापारी, मच्छिमार, होड्या बनविणारे कारागीर,
राज दरबारातील आणि मंदिरातील सेवा राज दरबार, मंदिरे सेवक, सैन्य, भालदार, चोपदार, खजिनदार, हिशेब ठेवणारे, अन्य कारकून, गायक, गायिका, नर्तिका, राज पुरोहित-ज्योतिषी, राज कवि, भाट, चार, खुषमस्करे, सल्लागार सारथी, हत्ती घोडे यांची देखभाल करणारे, भोई, पाणी वाहणारे, हेर, पुजारी, गुरव, प्रवचनकार
अन्य सामाजिक सेवा शहर गांव रक्षक, गायक, गायिका, नर्तक, वैद्य-रुग्णसेवक, सेविका, चित्रकार, जनावरांचे खेळ करणारे, केशकर्तन, बहुरुपिये, नाट्यकर्मी, गोंधळी, ज्योतिषी, वारांगना, सावकार अनेक लोक अशी सेवा कामे करत.
१० अरण्ये, रानावनांतील उत्पादने मसाल्याचे पदार्थ, लाकूड, चंदन, लाख, मध, डिंक, औषधी वनस्पती जंगली जनावरांचे कातडे, शिंगे, नखे, इत्यादी अरण्य, रानावनांत वनवासी, सामान्य गावक-यांपासून दूर रहाणारे लोक,

भारताची लोकसंख्या इ.स.१००० मध्ये सुमारे ८ ते १० कोटी होती असे सांगितले जाते. यातील सुमारे ८०% लोकं शहराबाहेर छोटी गावे, वाड्या व रानावनांत रहात असावीत. आपण आता या चार भागातील लोकांच्या गरजा आणि त्या ठिकाणी असणारे उद्योग व्यवसाय विस्ताराने पुढील भागांतून पाहू.

– श्री. श्याम वैद्य

संदर्भसूची:

Economic Organisation in Ancient India (200 BC – 200 AD)- By Shyamsundar Nigam – 1975
A survey of Indian Culture and Civilisation – By K.T.Shah B.A., B.Sc. (Lond.) – 1930
Mensuration in Ancient India – By Saradha Srinivasan – 1979 – Library – Archaeological Survey of India
Indian Shipping – A Historical Survey – By Baldeo Sahai  – April 1996
Industrial Evolution In India – By – Alfred Chatterton — Feb 1912 – Madras
Sketches of Indian Industries – By An Industrialist – Govt. College Library – Kota ( 1959 )
हाल सातवाहनाची गाथा सप्तशती  संपादक – स.आ.जोगळेकर
कौटिलीय अर्थशास्त्र  प्रकाशक – ह.अ.भावे
लीळाचरित्रातील समाजदर्शन – सुमन बेलवलकर
Minor Forest Products of India : Non-Timber Forest Products of India  – Murthy T. Krishna
The Rise and Fall of the Great Powers  – Paul Kennedy
Paper on Minerals and their Exploitation in Ancient and Pre-modern India – by A.K. Biswas Professor in History of Science, The Asiatic Society, Calcutta, India.
History of Indian Science, Technology and Culture AD 1000-1800 — edited by A. RAHMAN
History of Technology in India – From Antiquity to c. 1200 A.D. – Editor A.K.Bag 1997
Iron in Acient India – Panchanan Neogi – 1914
The Agaria – by Verrier Elwin – 1940
The Sushruta Samhita – Kaviraj Kunja Lal Bhishagratna – 1907
The way of  the shilpis – Govind Krishna Pillai  – 1948
Mysore Tribes and Casts – Vol. IV
History of South India – Neelakanth Sastri

4 Comments

 1. Nicely summarized professions of people living in different zones such as near forests, villages, small towns and cities. Coming from a village, I had living experience of people being active in different professions getting the training at home . In last 40-50 years, with advances made in education, transport, jobs in government and industry sectors, children have slowly stopped continuing in traditional professions. Also, mass production in industries have made some professions not sustainable.

  1. One important thing was missing i.e. everything was looked up as ” Kala ” and thus Gayan wadan nrutya shortly Sangeet is missing in all this writeup.
   “Asta pradan ” & their responsibilities needs to be studied further.
   Aryanche ugam shtan sathi please read Artikhomes in vedas (by our Great personality Lokmanya Tilak )
   You can trace this at kesari wada

 2. Yes, things have changed so much over last more than a 150 years or so … People have lost their livelihood, they have forgotten their skills, the art … They look down upon their traditional occupations instead of being proud of it and caring for if …

 3. लेख छान. संदर्भग्रंथही नोंदवल्यामुळे लेखाला छान उठाव आला आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s