पद्मश्री दुलारी देवी

कधीही शाळेत न गेलेल्या, एकही वर्ग न शिकलेल्या दुलारी देवी आज “पद्मश्री दुलारी देवी” झाल्या आहेत. मधुबनी चित्रकलेसाठी त्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. बिहारच्या मधुबन जिल्ह्यातील रांती गावच्या दुलारी देवी यांना पद्मश्री पुरस्काराने ह्या वर्षी गौरविण्यात आले आहे.

दुलारी देवी झाडलोट आणि फरश्या पुसण्या सारखे, धुणं भांड्याची कामे करत आपला उदरनिर्वाह चालवत असत. पण काही करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच त्यांचा प्रवास सुरु झाला आणि आज पद्मश्री ह्या बिरुदावलीत दुलारी देवी हे नाव अलंकृत झाले आहे.

खरंतर माणसाला जगायला शिकवते ती म्हणजे कला आणि माणूसपणाच्या जगण्याला एक उंची देते ती म्हणजे सुद्धा कला आहे. दररोजच्या कंटाळवाण्यातून हवाहवासा वाटणारा विरंगुळा म्हणजे कुठलीही कला कारण कला जगण्याला सौंदर्य प्रदान करतातच आणि ह्या कलेमुळे जगणे अधिक सुसह्य होत जाते त्यातली अनेकांच्या जवळची, अनेकांना उपजत असलेली कला म्हणजे चित्रकला. शब्दांपासून दूर नेण्याची ताकद ही चित्रात असते. चित्रं ही माणसाच्या मनात विचारांची स्पंदने निर्माण करतात आणि चित्र आपल्याला विचारांनी समृद्ध करत असतात आणि आज मधुबनी चित्रकलेसाठी पद्मश्री मिळवलेल्या दुलारी देवी ह्या सातव्या स्थानी आहेत. आजवर ह्याच मधूबनी चित्रासाठी सहा जणांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे देखील कायम कौतुक करत असत.

मल्लाह जातीच्या अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या दुलारी देवी ह्यांचे वयाच्या १२ व्या वर्षी लग्न झाले. घरोघरी झाडझुड आणि फरश्या पुसण्याची काम करताना प्रसिद्ध मधुबनी चित्रकलाकार कपुरी देवी यांच्या संपर्कात आल्यावर त्यांचा कलाप्रवास सुरू झाला. पुढे दुलारी देवी ह्यांनी घराचे अंगण लाकडापासून बनवून आपल्या कल्पनांना आकार द्यायला सुरुवात केली. कपूरी देव ह्यांच्या कडून शिक्षण घेत दुलारी यांनी मिथिला चित्रकला क्षेत्रात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली.

दुलारी देवी यांनी आतापर्यंत विविध विषयांवर सात हजार मिथिला पेंटिंग्ज केल्या आहेत. दुलारी देवी ह्यांच्या कार्यासाठी त्यांना राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गीता वुल्फचे ‘फॉलोइंग माय पेंट ब्रश’ पुस्तक आणि मार्टिन ले कॉज यांचे फ्रेंच पुस्तक मिथिला दुलारी देवी यांच्या जीवनाची कथा आणि कलाकृतींनी सुसज्ज आहेत. त्यांच्या चित्रकलेला सतरंगी नावाच्या पुस्तकातही जागा मिळाली आहे. इग्नूसाठी मिथिला चित्रामध्ये तयार केलेल्या आधार कोर्सच्या मुख्यपृष्ठासाठीही त्यांची चित्रकला निवडली गेली आहे. पटना येथील बिहार संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दुलारी देवी यांना खास आमंत्रित केले होते. तेथे कमला नदीच्या पूजेवर बनवलेल्या चित्रांना स्थान देण्यात आले आहे. मधूबनी चित्रांसाठी पद्मश्री मिळालेल्या दुलारी देवी ह्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. विद्यमान सरकार २०१४ पासून अशाच सामान्यातल्या असामान्य व्यक्तींचा गौरव करत आहे.

✍️ सर्वेश फडणवीस


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: