भाषा – मराठी
लेखक – दीपाली पाटवदकर
चित्रे – विवेकानंद पाटील
प्रकाशक – भारतीय विचार साधना
पृष्ठ – ४४
किंमत – ५०/-
Click To Order |
दीपाली पाटवदकर यांनी अनेक वर्ष IT क्षेत्रात काम केले आहे. तसेच त्या Indologist आहेत. लहान मुलांना शास्त्रज्ञांची ओळख करून देण्यासाठी लिहीलेले हे पुस्तक आहे. सुंदर रंगीत चित्रांनी हे पुस्तक आकर्षक झाले आहे. ५ व्या शतकातील आर्यभट्ट या गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाची ओळख करून देणाऱ्या पुस्तकातील एक छोटा भाग –
आर्यभट्ट सांगतात – पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाची वेगळी वेळ असते. एकीकडे रात्र असेल तर दुसरीकडे दिवस असतो. एकीकडे सकाळ असेल तर दुसरीकडे संध्याकाळ असते. त्यांना पृथ्वी गोल आहे, सूर्याने प्रकाशित आहे आणि विविध ठिकाणाचे उदयास्त एकमेकांशी कसे बांधलेले आहेत हे माहित होते. ते म्हणतात –
उदयो यो लंकायाम् सोस्तमय: सवितुरेव सिद्धपुरे
मध्याह्नो यवकोटयाम् रोमक विषयेSर्धरात्र:स्यात ||
लंकेत सूर्योदय होतो, त्यावेळी सिद्धपुरी सूर्यास्त, यवकोटला दुपार तर रोमक प्रदेशात रात्र असते.