भाषा – मराठी, English
लेखक – दीपाली पाटवदकर
पृष्ठ – ४४
किंमत – १६० १००/-
Click To Order |
कर्मयोगातील ओव्यांच्या आधारे ज्ञानेश्वरीची ओळख करून देणारे हे लहानसे पुस्तक आहे. लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाला आवडेल असे. कोणतेही पण उघडून एक ओवी पहावी – वाचावी आणि दिवसभर त्याचेच मनन करावे असे. संग्रही असावे असे पुस्तक. प्रत्येक ओवीवर एक चित्र, आणि त्या ओवीचे मराठी व इंग्रजीतून निरुपण. या पुस्तकातील काही भाग –
ऐसी दशा येईल पुढे | तै मन होईल वेडे |
तव चिंतुनी ठेवी चोखडे | आत्मज्ञान || १३.५८१ ||
“I am too young to read scriptures! This is for my grand-parents! I will read it after I am 60.”
The sooner you read Dynaneshwari, the more time you will have time to implement the learnings in your life. By improving yourself year over year, you will surely become successful, happy, healthy and a content person.
As a day well spent brings happy sleep, so a life well spent brings happy death. – Leonardo da Vinci
“ज्ञानेश्वरी वाचायला मी खूप लहान आहे! ते पुस्तक माझ्या आजी-आजोबांसाठी आहे! मी ६० वर्षांचा झालो की वाचीन.”
आयुष्यात ज्ञानेश्वरी जितकी लवकर वाचाल, तितका अधिक वेळ त्यातील जीवनावश्यक शिकवण आचरणात आणायला मिळेल. प्रत्येक वर्षी स्वतः मध्ये सुधारणा करत करत तुम्ही निश्चित कर्तृत्ववान, यशस्वी, प्रेमळ आणि आनंदी व्हाल.
ज्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली, त्या वयात वाचली पाहिजे – प्रा. राम शेवाळकर