भाषा – मराठी
लेखक – ओंकार जोशी
प्रकाशक – Booksclinic Publishing
पृष्ठ – १४९
किंमत – २००/-
पुस्तक खालील ठिकाणी उपलब्ध आहे –
रूपकुंड! हिमालयाच्या कुशीत वसलेला एक तलाव. कधी काळी पार्वतीने या तलावात तिचे प्रतिबिंब पाहिले होते. त्या रूपवान प्रतिबिंबाने त्याला नाव मिळाले ‘रूपकुंड’. या कुंडाला कोणाची तरी दृष्टच लागली. आज या कुंडात ३००-३५० मानवी सांगाडे पसरलेले आहेत. रूपकुंडवर अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास करून सांगतात – हे मानवी सापळे जवळ जवळ १२०० वर्षे जुने आहेत. असं काय घडलं होतं तेंव्हा की ज्यात ३००-३५० जणांचा एकाचवेळी एकत्र मृत्यू झाला? कुणी त्यांचा बळी दिला, की त्यांची हत्या झाली की काही अपघात झाला? कुठल्याही सांगाड्यावर, वर्मी बसावी अशी खूण नाही पण सापडलेल्या सगळ्या कवट्यांवर मात्र घावांचे वण दिसतात. असं वाटतं, की डोक्यावर काहीतरी जबरदस्त आघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या पुस्तकाची नायिका अवनी, याच विषयाचे संशोधन करायला अमेरिकेतून आली आहे. जसा तिचा अभ्यास सुरु होतो तसे यातील गूढ गडद होत जाते. भूतकाळ आणि वर्तमानाच्या गुंफणातून मृत्यूच कोडं उलगडत जाते
भूत आणि वर्तमानात खेळणारी ही रहस्य कथा ओंकार जोशी यांनी सुरेख रंगवली आहे. हे पुस्ततक लिहिण्यासाठी श्री जोशी रूपकुंड येथे जाऊन तेथील सर्व गोष्टींचा अनुभव स्वत: घेऊन आले. ही कथा वाचकाला खिळवून ठेवणारी आहे.
काय आहे हे रूपकुंड रहस्य ? अवनीला कसे सापडले त्याचे धागेदोरे? भूतकाळातल्या या रहस्याशी अवनी कशी जोडली गेली? नंदादेवी राज जात यात्रा काय आहे? जाणून घेण्यासाठी ओंकार जोशी लिखित, ‘रूपकुंड,मृत्यूचं न उलगडलेलं कोडं’ हे पुस्तक वाचा!
अप्रतिम, अद्भुत, मेंदू गोठवणारी प्रचिती …